इंदापूर : इंदापूर तालुक्यातील मु.रामवाडी पोस्ट बडापुरी येथील घरातून दिवसाढवळ्या 7 तोळे सोने आणि 1 लाख रुपये रोख रक्कम असा 3 लाख 61 हजार 401 रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला आहे. याबाबत सूरज विलास कोरटकर (रा.मु.रामवाडी पोस्ट बडापुरी ता.इंदापूर) यांनी फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार दि.18 डिसेंबर रोजी दुपारी 12:45 च्या सुमारास एका अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांच्या घरात प्रवेश करून घरातील बेडरूम मधील दोन्ही कपाटात असणारी एक लाख रुपयांची रोख रक्कम व 7 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने असा 3 लाख 61 हजार 401 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरी करून नेला आहे.
सुरज कोरटकर यांच्या फिर्यादीवरून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोसई लिगाडे करीत आहेत.