दौंड : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने,खा. सुप्रिया सुळे यांच्या पुढाकाराने राष्ट्रीय वयोश्री योजना व एडीप(ADIP) योजनेअंतर्गत,60 वर्षावरील ज्येष्ठ व्यक्तींसाठी मोफत कृत्रिम अवयव व साधने वाटपासाठी नाव नोंदणी व मोजमाप शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन पक्षाचे ता. अध्यक्ष आप्पासो. पवार यांच्या हस्ते करण्यात आले. शिबिरास उस्फुर्त प्रतिसाद मिळाला, साधारणतः 3300 जणांनी शिबिरामध्ये नाव नोंदणी केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी वैशाली नागवडे, गुरुमुख नारंग,इंद्रजीत जगदाळे, विकास कदम ,सोहेल खान,वसीम शेख, वैशाली धगाटे, सचिन गायकवाड, निखिल स्वामी,दीपक सोनवणे आदि मान्यवर उपस्थित होते.
शिबिरामध्ये कान, डोळे,दंत( कवळी) तपासणी करण्यात आली. अपंग लोकांसाठी च्या कृत्रिम अवयवासाठी मोजमाप करण्यात आले. चष्मे, श्रवणयंत्र, कमरेचा व मानेचा पट्टा, कृत्रिम अवयव, वॉकर,व्हीलचेअर आदी साहित्य नाव नोंदणी केलेल्या रुग्णांना घरपोच देण्यात येणार आहे. दौंड सह तालुक्यातील रावणगाव येथेही शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तसेच वरवंड(13 डिसेंबर)व खुटबाव(14 डिसेंबर) येथेही सदरच्या शिबिराचे आयोजन करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी यावेळी सांगितले.