दौंड : दौंड तालुक्यातील चौफुला येथे वाहनांच्या अतिक्रमणामुळे पुणे सोलापूर आणि शिरूर सातारा हायवेवर मोठ्या प्रमाणावर ट्रॅफिक जॅमची समस्या उद्भवत होती. याचा फटका अष्टविनायक दर्शन करण्यासाठी येणाऱ्या भविकांनाही मोठ्या प्रमाणावर बसत होता. या सर्व प्रकाराबाबत सहकारनामा ने यावर आवाज उठवत याबाबतची सडेतोड बातमी केली होती.
या बातमीचा चांगला इफेक्ट आजपासून पाहायला मिळत असून यवतचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी चौफुला याठिकाणी पोलीस तैनात करत येथील रस्त्यामध्ये, ब्रिजवर, आणि दुकान, हॉटेलसमोर लागणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. तसेच याठिकाणी नो पार्किंग बोर्ड लावण्यात आले असून येथे लावण्यात येणाऱ्या वाहनांवर आता कारवाई सुरू करण्यात आली आहे.
सहकारनामा च्या सडेतोड बातमीचे अनेकांनी स्वागत केले होते. याबाबत पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी कारवाई करण्याचे पोलिसांना आदेश दिले असून त्यामुळे येथील वाहतूक कोंडी दूर होऊन प्रवासी आणि स्थानिक ये जा करणाऱ्या नागरिकांना याचा मोठा फायदा होऊ लागला आहे.