दौंड : पुणे सोलापूर हायवेवर यवत पोलीस स्टेशन हद्दीमध्ये असणाऱ्या बोरिभडक गावाजवळ एका तृतीय पंथीयाचा खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत यवत पोलीस घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी विविध मार्गाने तपास सुरू केला आहे.
बोरिभडक या गावाच्या हद्दीमध्ये असणाऱ्या आणि पुणे सोलापूर महामार्गालगत असणाऱ्या गायरान जागेत हा खून करण्यात आला आहे. हा खून सुमारे दोन दिवस अगोदर झाला असल्याचा अंदाज पोलीसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
खून झालेल्या 26 वर्षीय तृतीय पंथीयाचे नाव बंटी असल्याचे सांगण्यात येत असून त्याची हत्या नेमकी कोणी आणि कोणत्या कारणासाठी केली असेल याबाबत पोलीस तपास करीत आहेत.
बोरिभडक जवळ रस्त्याच्या कडेला असणाऱ्या काटवानाजवळ अनेक महिन्यांपासून काही तृतीय पंथीय रात्रीच्यावेळी थांबलेले दिसत असायचे. येथे अनेकवेळा दुचाकी आणि चारचाकी गाड्याही बाजूला थांबलेल्या पाहायला मिळत होत्या. त्यामुळे येथे नेमके काय चालत होते आणि त्यातून तर हा खून झाला नसावा ना अशी चर्चा गावकरी करत आहेत.









