आंदोलन शांततेच्या मार्गाने होते हिंसाचाराच्या नाही, कारवाई होणार : नवाब मलिक

मुंबई : त्रिपुरा येथील घटनांचा निषेध करण्यासाठी जे ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आले. त्यातील काही ठिकाणी जमाव हिंसक होऊन दगडफेकीच्या घटना घडल्या या सर्व घटनाक्रमावर राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मंत्री नवाब मलिक यांनी याबाबत बोलताना काल राज्यात ठिकठिकाणी झालेल्या आंदोलनामध्ये काही ठिकाणी हिंसक वळण लागल्याचे समजत आहे. या हिंसक आंदोलनाचा मी निषेध करत असून त्रिपुरामध्ये जे प्रार्थना स्थळांसोबत घडले आणि तेथे जी हिंसा झाली, त्यासोबतच वसीम रिझवीने लिहिलेल्या पुस्तकाविरोधातही काही संघटनांनी बंद पुकारला यादरम्यान नांदेड किंवा इतर ठिकाणी ज्या हिंसात्मक घटना घडल्या आहेत अशा घटनांचा आम्ही निषेध करतो. आंदोलन करणे किंवा निषेध करणे हा जनतेचा अधिकार आहे.

पण आंदोलन करताना त्याला लगाम नसणं आणि त्याला शिस्त नसणं हे चुकीचं असून अशा पद्धतीने हिंसक आंदोलन करणाऱ्यांवर आणि याला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई होणारच आहे. तुम्ही दिशाहीन मिसाईल सारखे कुठेही काहीही करू शकत नाही असे शेवटी नवाब मलिक म्हणाले आहेत.