दौंड : शिरूर-सातारा हायवेवर अनेक ठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य पाहायला मिळत असून केडगाव-चौफुला रोडवर मयुरेश्वर हॉस्पिटल समोर तर कायमच मोठे खोल खड्डे होत असल्याचे पाहायला मिळते. या खड्ड्यांमुळे येथे अपघातही होत असतात मात्र तरीही हे खड्डे बुजवले जात नाहीत असा आरोप येथील नागरिकांकडून करण्यात येत आहे.
दररोज या रस्त्याने ये-जा करणाऱ्या लोकांना याचा मोठा ट्रास होत असतो. त्यामुळे या त्रासाला वैतागून सकाळी जिमसाठी जात असलेल्या तरुणांनी रत्यावरील या खड्ड्यांमध्ये आज सकाळी प्रासंगिक ऊस लागवड केली आहे.
संबंधित विभागाने या रस्त्यावरील खड्डे त्वरित बुजवून होणारे अपघात टाळावेत अशी मागणी या युवकांनी केली आहे. या खड्ड्यांना चुकविण्याच्या नादात अनेक अपघात होत असून यामुळे कित्येक लोकांना आपले प्राण गमवावे लागले असून काहींना कायमचे अपंगत्व आले असल्याचे या तरुणांचे म्हणणे आहे.