‛दाऊद’चे कोकणातील घर ‛सनातन’ ने घेतले आहे मग त्यांचे आणि दाऊदचे संबंध होते असे म्हणायचे का.. उद्या मीच देवेंद्र फडणवीस आणि अंडरवर्ल्डचे संबंध समोर आणणार : नवाब मलिक

मुंबई : देवेंद्र फडणवीस यांचे फटाके भिजलेले निघाले, त्यामुळे त्यात आवाज झाला नाही.. आमच्यावर आरोप करणारांना कधीच काही निष्पन्न करता आले नाही. मात्र, देवेंद्र फडणवीस आणि अंडरवर्ल्डचे काय संबंध आहेत ते उद्या 10 वाजता मी समोर आणणार असल्याचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी आपल्या पत्रकार परिषदमध्ये सांगितले.

जी प्रॉपर्टी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितली तेथे एक रहिवासी बिल्डिंग आहे आणि त्यामध्ये 140 फ्लॅट आहेत. अगोदर तेथे आम्ही भाडेकरू म्हणून राहत होतो आणि त्याच ठिकाणावरून भाजप, शिवसेना काळात निवडून आल्यानंतर मोठा जल्लोष साजरा करण्यात आला होता असे नवाब मलिक यांनी सांगितले. आम्ही तेथे भाडेकरू होतो. आम्ही कधी बॉम्बस्फोटातील आरोपींकडून ती प्रॉपर्टी घेतली नाही. तर त्या प्लॉटच्या मालकीनीकडून आम्ही जी प्रॉपर्टी घेतली त्यामध्ये तेथे राहणाऱ्या वाचमन चे नाव त्या प्रॉपर्टीवर आले होते. त्यामुळे त्या प्रॉपर्टीवरील नाव कमी करण्यासाठी ती जागा आम्ही खरेदी केली असल्याचे मलिक यांनी म्हटले आहे.

खोटं बोलून तुम्ही आम्हाला बदनाम करू शकत नाही, खोटं बोलून तुम्ही लोकांची दिशाभूल करण्याचे काम करत आहात असे मलिक यांनी म्हटले आहे. नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार प्रहार करत फडणवीसांचा खबरी हा कच्चा खेळाडू असल्याचे म्हटले आहे. उद्या सकाळी १० वाजता भाजप नेते फडणवीस यांच्या अंडरवर्ल्ड लिंकचा आपण खुलासा करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
मलिक म्हणाले की, माहिती देणाऱ्याने फडणवीस यांना चुकीची माहिती दिली. त्यांच्या ६२ वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत असे आरोप झाले नाहीत. आणि माझे अंडरवर्ल्डशी कोणतेही संबंध नाही. मात्र आता मी फडणवीसांचे अंडरवर्ल्डशी असलेले कनेक्शन अवश्य समोर आणणार असे सांगीतले आहे.
आरोपींकडून जमीन खरेदीच्या आरोपावर नवाब मलिक म्हणाले की, आम्ही कथित जमिनीचे भाडेकरू आहोत. मुंबई हल्ल्यातील आरोपींकडून आम्ही कोणतीही जमीन खरेदी केलेली नाही. आम्ही भाडेकरू म्हणून त्या जागेच्या मालकिणीला पैसे दिले होते आणि त्या वाचमन ने आपले नाव त्या प्रॉपर्टीवर चढविल्याने त्याचे नाव कमी करण्यासाठी आम्ही त्याला पैसे देऊन ते नाव कमी असल्याचे मलिक यांनी सांगितले.