|सहकारनामा|
इंदापूर : उजनी धरणामध्ये दिवसेंदिवस वाढत चाललेली वाळू चोरी आता इंदापूर पोलिसांच्या रडारवर आली असून आज दिनांक 31 जुुलै रोजी इंंदापूरचे पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे व इंदापूर चे तहसीलदार अनिल ठोंबरे यांच्या संयुक्त कारवाईने उजनी जलाशयामध्ये अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्या यांत्रिकी बोटी जिलेटिनच्या सहाय्याने उद्ध्वस्त करण्यात आल्या आहेत.
या कारवाईमध्ये एकूण 40 लाख रुपये किमतीच्या वाळू उपसा करणाऱ्या यांत्रिकी बोटी उद्ध्वस्त करण्यात आलेल्या असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
उजनी जलशयामध्ये यांत्रिक बोटींद्वारे मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा सुरू असून त्यास पायबंद घालणे महसूल आणि प्रशासनाच्या दृष्टीने गरजेचे होते. त्यामुळे उजनी जलाशयामध्ये नेमकी कुठे वाळू चोरी होत आहे याबाबत पोलीस आणि महसूल यंत्रणा गुप्तपणे माहिती घेत होती. आज 31 जुलै रोजी महसूल विभाग आणि इंदापूर पोलिसांना उजनी जलशयामध्ये यांत्रिक बोटींद्वारे वाळू उपसा सुरू असल्याची माहिती मिळताच त्यांनी संयुक्तपणे कारवाई करत 40 लाखांच्या बोटी जिलेटीनच्या सहाय्याने उध्वस्त केल्या.
सदर कारवाईमध्ये धन्यकुमार गोडसे पोलीस निरीक्षक इंदापूर पोलिस स्टेशन, अनिल ठोंबरे तहसीलदार इंदापूर तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश माने, पोलीस शिपाई अमोल गारुडी, समाधान केसकर, राजू नवले, अर्जुन भालसिंग पोलीस पाटील राजेंद्र शिंदे, अरुण कांबळे, संजय राऊत, महसूल विभागाचे तलाठी यांचा कारवाईमध्ये सहभाग होता. वाळू वाळू माफियांवर धडक कारवाई चालू असून त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले असल्याचे यावेळी पोलिसांनी सांगितले.