‛वेश्याव्यवसाय’ करणाऱ्या हॉटेलवर ‛धाड’, एकास अटक 2 तरुणींची सुटका

भिगवण : दोन तरुणींकडून आर्थिक फायद्यासाठी वेश्याव्यवसाय करवून घेणाऱ्या हॉटेलवर वालचंदनगर (भिगवण) पोलीसांनी धाड टाकून यात एकाला अटक केली तर दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली.

हि घटना दि.26/10/2021 रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास मदनवाडी (ता. इंदापुर जि पुणे) गावचे हद्दीत असणाऱ्या आनंद हॉटेल व लॉजमध्ये घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी गंगाजी नारायणराव आवरगंड (वय . 32 वर्ष , व्यवसाय.हॉटेल / लॉजींग, रा.भिगवण, ता.इंदापुर , जि . पुणे, मुळ रा.रूमणा जवळा ता.गंगाखेड , जि.परभणी) यास अटक केली आहे. याबाबत रूपेश विजयसिंह कदम , (पोलीस उपनिरीक्षक , नेमणुक भिगवण पोलीस स्टेशन) यांनी फिर्याद दिली आहे.

यातील आरोपी हा आनंद लॉजमध्ये मिळुन आलेल्या वरील 2 पिडीत महिलांच्या मार्फत स्वताचे आर्थिक फायद्या करीता वेश्याव्यवसाय करीत असताना व त्यांना अनैतिक व्यापार करणेस प्रोत्साहन देत असताना मिळुन आला. पुढील तपास पो.नि.ढवाण (बारामती तालुका पोलीस स्टेशन) हे करीत आहेत