पुणे / उरुळी कांचन : दौंड तालुक्यातील राहू येथील रहिवासी आणि राहू येथील दोन युवकांच्या गोळीबार, हत्येतील आरोपी संतोष जगताप याच्यावर उरुळी कांचन येथे गोळीबार झाल्याची घटना समोर येत आहे. सध्या संतोष जगताप याची परिस्थिती गंभीर असून हा हल्ला उरुळी कांचन येथील एका हॉटेल समोर झाल्याची माहिती मिळत आहे.
याबाबत पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून ते आरोपींचा शोध घेत आहेत. सूत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार संतोष जगताप हा एका प्रसिद्ध हॉटेल समोर आला असताना उरुळी येथीलच काही गुंडांनी त्याच्यावर पिस्तूलातून गोळीबार केल्याची माहिती मिळत असून संतोष जगताप याच्या अंगरक्षकांनीही केलेल्या प्रति हल्ल्यात त्या टोळीतील एकजण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.जखमी गुंड हा त्याच्या साथीदारांसह फरार झाला असून संतोष जगताप यावर खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत.