बाबो.. शिरूर येथील बँक दरोड्याच्या लुटीतील अधिकृत आकडेवारी आली समोर, विश्वास बसणार नाही इतके ‛सोने’ आणि एवढी ‛रक्कम’ दरोडेखोरांनी नेली लुटून

पुणे / शिरूर :
शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे काल ऐन दुपारी महाराष्ट्र बँकेवर दरोडा टाकण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली होती.
या घटनेत करोडो रूपयांचे सोने आणि रक्कम दरोडेखोरांनी लुटून घेऊन गेल्याचे स सांगण्यात येत होते मात्र त्याची अधिकृत आकडेवारी समोर आली नव्हती. मात्र ‛सहकारनामा’च्या हाती या लुटीतील अधिकृत आकडेवारी लागली असून तब्बल 1 कोटी 88 लाख 50 हजार रुपयांचे दागिने व रोख रक्कम दरोडेखोरांनी लुटून नेली असून यात 525 तोळे सोन्याच्या दागिन्यांचा समावेश आहे.
या प्रकरणी सागर उत्तम पानमंद यांनी फिर्याद दिली आहे.
शिरूरच्या
पिंपरखेड गावातील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेमध्ये पाच अनोळखी
इसमांनी घुसून हातातील पिस्तूलाचा धाक दाखवत बँकेतील कर्मचाऱ्यांना
मारहाण केली आणि जीवे
मारण्याची धमकी देत बँकेतील 1 कोटी 88 लाख 50 हजारांचा ऐवज लुटून नेला असे फिर्यादीत म्हटले आहे.