|सहकारनामा|
पुणे/दौंड : (अब्बास शेख)
दौंड तालुक्यातील पाटस येथे दि.3 ऑगस्ट रोजी रात्री सव्वा एक वाजता एसटी बस अडवून प्रवाश्यांकडे असणारी सुमारे 1 कोटी 12 लाख 36 हजारांची रक्कम चोरणाऱ्या टोळीचा आज सकाळी 11 वाजता फर्दाफाश होणार असून या टोळीतील जवळपास 3 जण हे आता Lcb च्या कवेत आले असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
पाटस येथे पोलिसांसारखा खाकी ड्रेस घालून, हातात पोलिसांकडे असणारी फायबर स्टिक घेऊन जवळपास चार ते पाच जणांच्या टोळक्याने एका एसटी बसला दुचाकी आडवी लावून त्यातील मोजकेच लोक गाडीतून उतरवले होते. या लोकांकडे असणारी सुमारे 1 कोटी 12 लाख 36 हजारांची रक्कम या आरोपींनी लुटली होती. हा गुन्हा घडल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट आणि त्यांच्या टीमला पुणे ग्रामिण पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी तातडीने याबाबत सूचना करत आरोपी निष्पन्न करून जेरबंद करण्याचे आदेश दिले होते.
Lcb टीमने तपास करताना अगोदर इतकी मोठी रक्कम या लोकांकडे कुठून आणि कशी आली व हि रक्कम ते घेऊन जाताना कुणाकुणाला माहीत असेल याचा शोध घेतला असता यात खुपच महत्वाची आणि मोठी माहिती या पथकाच्या हाती लागली. त्यातूनच Lcb टीम ने आता मोठी कारवाई केली असून याबाबत सविस्तर बातमी हि लवकरच आम्ही देत आहोत.