माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनाची बातमी ‛फेक’, जाणून घ्या सध्याची परिस्थिती

नवी दिल्ली :

देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनाची बातमी फेक असून कुणीही या अफवेवर विश्वास ठेवू नये. सध्या मनमोहन सिंग हे डेंग्यूने त्रस्त असल्याने त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सकाळपासून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असंल्याची माहिती एम्सच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
मनमोहन सिंग यांना ताप आल्यानंतर त्यांना अशक्तपणा जाणवू लागला होता त्यानंतर त्यांना बुधवारी संध्याकाळी अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) दाखल करण्यात आले.
मनमोहन सिंग हे डेंग्यूने ग्रस्त असल्याचे आढळून आले होते, मात्र आता त्यांच्या प्लेटलेटची संख्या वाढत आहे आणि त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे असे एम्सच्या एका अधिकाऱ्याने आज सांगितले आहे.