|सहकारनामा|
दौंड : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला दौंड मधील तीन पत्ती जुगार अड्ड्यावर धाड टाकून जुगाऱ्यांवर गुन्हा दाखल करून त्यांना पोलीस स्टेशनचा रस्ता दाखविण्याची कामगिरी दौंड पोलिसांनी बजाविली. या प्रकरणी 9 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून जुगार अड्यावरून 6 हजार 20 रुपयांची रोकड पोलिसांनी जप्त केली आहे. जामीन कब्जा भरून घेत आरोपींना बॉण्ड वर सोडण्यात आले आहे.
दौंड पोलिसांच्या माहिती नुसार, दि.14 ऑगस्ट रोजी रात्री 8.30 च्या सुमारास येथील संत मदर तेरेसा चौक (नगर मोरी) परिसरात बेकायदेशीरपणे तीन पत्ती जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी या जुगार अड्ड्यावर धाड टाकली असता पैसे लावून तीन पत्ती जुगार खेळला जात होता.
जुगार अडयावरून पोलिसांनी नऊ जणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला व त्यांच्याकडून 6 हजार 20 रुपयांची रोकड जप्त केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. बबलू मंजुळे, ख्वाजा शेख, समीर शेख, अहमद नदाफ, मैनुद्दिन शेख, सनी कोळी, गोविंद भोंगळे, नासिर खान आणि श्रीकांत थोरात अशी गुन्हा दाखल आरोपींची नावे आहेत. पोलीस रेकॉर्ड वरील एक गुन्हेगार या अड्ड्यावर जुगार खेळत असल्याची माहिती काहींनी पोलिसांना दिली होती असे बोलले जात आहे. पोलिसांच्या धाडीत मात्र तो सापडला नाही.
पोलिसांची चाहूल लागताच तो पळून गेला की तो त्या ठिकाणी नव्हताच याची चर्चा रंगली आहे. पो. उपनिरीक्षक पालवे, पो. हवा. पांडुरंग थोरात, पो. कॉ. रवी काळे, शेखर झाडबुके व चालक हिरवे या पथकाचा कारवाईत सहभाग होता.