|सहकारनामा|
पुणे : सदनिका विक्री केलेली असतानाही त्याची दुबार विक्री करून तक्रारदार यांना ताबा न देता त्यांची सुमारे एकतीस लाखाची फसवणूक केलेबाबत मांजरी येथील बिल्डरवर हडपसर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
मौजे मांजरी बु॥, गोपाळपटटी, माधवबाग ता.हवेली जि.पुणे येथील श्री अपार्टमेंट बांधकाम साईटवरील दुस-या मजल्यावरील फ्लॅट क्र.२०६ (६२६ चौ.फुट) व फ्लॅट क्र.२०७ (७०२ चौ.फुट) हे दोन फ्लॅट हे बिल्डर सचिन दत्तात्रय वटारे (रा.बी.टी.कवडे रोड, घोरपडी, पुणे) यांनी यातील तक्रारदार रविकिरण बाबासाहेब चव्हाण (रा.साडेसतरा, हडपसर पुणे) यांना सन २०१५ मध्ये मा.सह दुय्यम निबंधक, हवेली क्र.३, मगरपटटा, हडपसर पुणे यांचेकडे खरेदी दस्त नोंदवुन त्याची विक्री करून त्यासाठी ॲडव्हान्स रक्कम ४,०२,५१०/- रोख स्वरूपात व फायनान्सतर्फे २७,४७,४९०/- रुपये असे एकूण ३१,५०,०००/- रुपये तसेच ८,५०,०००/- रुपयाचे चेक घेवूनही
यातील फिर्यादी हे बांधकाम झाल्यानंतर साइटवर गेले असता तेथे त्यांचे खरेदी केलेल्या दोन्ही फ्लॅटमध्ये अनोळखी व्यक्ती राहत असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांनी त्यांचेकडे चौकशी केली असता त्यांनी सदर फ्लॅट हे बिल्डर कडून विकत घेतलेचे त्यांना सांगितले. त्यामुळे त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात आलेने त्यांनी पोलीस स्टेशनला तक्रारी अर्ज दिल्यावरून झालेल्या चौकशीमध्ये बिल्डर सचिन दत्तात्रय वाटारे याने सदर फ्लॅटपैकी फ्लॅट क्र.२०७ हा सप्टेंबर २०१५ मध्ये नोटरी करारनामा करुन हिरावती पाल, राममुरत पाल यांना विक्री करून त्यांना राहणेसाठी प्लॅट क्र. २०६ चा ताबा दिला व फ्लॅट क्र.२०७ हा सुरेखा सोपान चौधरी या महिलेस ऑक्टोबर २०१६ मध्ये सह दुय्यम निबंधक, हवेली क्र.१८ काळेवाडी, पिंपरी, पुणे यांचेकडे दस्त नोंदवून यापूर्वी विक्री केलेला असतानाही बेकायदेशीररित्या दोन वेळा वेगवेगळ्या व्यक्तींना विक्री केल्याचे उघड झाले. बिल्डर सचिन वटारे यांनी तक्रारदार रविकिरण बाळासाहेब चव्हाण यांना मांजरी बु॥ हडपसर येथील दोन फ्लॅटचे पैसे घेऊन खरेदी खत करून दिलेले असतानाही बिल्डिंग बांधकाम पूर्ण झाल्यानंतर तक्रारदार यांना ताबा न देता सदरचे फ्लॅटची बेकायदेशीरपणे परस्पर आणखी दोघांना नोटरी करारनामा व खरेदी खताने विक्री करुन त्याचा ताबा फिर्यादी यांना न देता फिर्यादी तक्रारदार यांची एकूण ३१,५०,०००/- (एकतीस लाख पन्नास हजार) रुपयांची फसवणुक केल्याचे निष्पन्न झालेले आहे. तक्रारदार यांनी बिल्डरकडे वेळोवेळी प्लॅटचा ताबा मागूनही तो न दिल्याने दिलेले पैसे परत मागितले असता उडवाउडवीची उत्तरे देवून बिल्डरने टाळाटाळ केली. म्हणून त्याबाबत तक्रारदार यांनी हडपसर पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून हडपसर पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नंबर ६३५/२०२१ भा.दं.वि. कलम ४२०, ४०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदर गुन्ह्याचा पुढील अधिक तपास हडपसर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांचे मार्गदर्शनाखाली मांजरी पोलिस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक पी.एम.शेळके हे करीत आहेत.
सदर बिल्डरने अशाप्रकारे अनेक लोकांची फसवणूक केल्याची शक्यता असून फसवणूक झालेल्या व्यक्तींनी हडपसर पोलीस स्टेशन येथे संपर्क साधावा.