निर्भया प्रकरण : अखेर चारही नराधमांना पहाटे फासावर लटकवले



दिल्ली : वृत्तसेवा

संपूर्ण देशामध्ये खळबळ माजविणाऱ्या निर्भया बलात्कार प्रकरणातील सर्व नराधम आरोपींना आज शुक्रवार दि. 20 मार्च रोजी पहाटे 5.30 वाजता फासावर लटकवण्यात आले. मुकेश सिंग (वय-३२), पवन गुप्ता (वय-२५), विनय शर्मा (वय-२६) आणि अक्षय कुमार सिंग (वय-३१) अशी या चार नराधम आरोपींची नावं होती.

निर्भया बलात्कार कांडामुळे  संपूर्ण देश हादरला होता. 2012 साली हे प्रकरण घडले होते त्यानंतर संपूर्ण देशभर  संतापाची लाट उसळली होती. नराधमांना दिल्यागेलेल्या फाशीवर बोलताना निर्भयाच्या आईने आपल्या मुलीच्या आत्म्याला आता शांती लाभेल अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.