महाराष्ट्रात कोरोनाचा दुसरा मृत्यू, कोरोनाबाधितांची संख्या 64 वरून 74 वर



मुंबई – महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच असल्याचे दिसत आहे, दररोज राज्यात कमी प्रमाणात का होईना पण कोरोनाबाधितांची संख्या वाढताना दिसत आहे. महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांचा आकडा चोवीस तासात पुन्हा एकदा वाढल्याचे पाहायला मिळत आहे. कालच्या प्रमाणात आज आणखी 10 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले असून यातील सहा मुंबईतील तर चार पुण्यातील आहेत. रविवारी दुपारपर्यंत कोरोना बधितांची संख्या 64 वरून 74 झाली असून एका नागरिकाचा मृत्यू झाला आहे.