good news rural lady police – पुणे ग्रामिण महिला पोलिसांना आता 8 तासांची ‛ड्युटी’, पुरुष पोलिसांनाही लवकरच ‛गुडन्यूज’



|सहकारनामा|

पुणे : पोलीस दलात कर्तव्य बजावत असलेल्या महिला पोलिसांना अनेकवेळा सण, उत्सव बंदोबस्त, गंभीर गुन्हे या निमित्ताने अनेवेळा जास्त वेळ ड्युटी करावी लागते. या सर्वात त्यांच्या कौटुंबिक जबाबदारीवर परिणाम होऊन त्यांच्या दैनंदिन जीवनावरही त्याचा परिणाम होत असतो. 

या सर्व बाबी लक्षात घेऊन पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी पोलीस दलातील महिला पोलीस अंमलदार यांच्या या अडचणींचा सहानुभूतीपूर्वक विचार करून पुणे ग्रामिण जिल्हा पोलिस अधीक्षक यांना महिला पोलीस अंमलदार यांना 8 तासाची ड्युटी देण्याविषयी मार्गदर्शक सूचना करून सदरचा प्रयोग प्रायोगिक तत्वावर पुणे ग्रामिण पोलीस दलात राबविण्याच्या सूचना केल्या होत्या. 

या सूचनांचे पालन करत पुणे ग्रामिण पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी 1 सप्टेंबर 2021 पासून महिला पोलिस अंमलदार यांना 8 तास ड्युटी देण्यात यावी असे आदेश देण्यात आले आहेत. या निर्णयाचे महिला पोलिसांनी स्वागत केले असून हा प्रयोग यशस्वी झाल्यास लवकरच पुरुष पोलिसांनाही 8 तासाच्या ड्युटीची गुडन्यूज दिली जाणार असल्याचे संकेत पुणे ग्रामिण पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी दिले आहेत.