‛कोरोना’बाबत पुणे जिल्ह्यासाठी घेतला गेला ‛हा’ मोठा निर्णय



पुणे : सहकारनामा ऑनलाईन

कोरोनाने आपले पाय शहरीभागामध्ये रोवल्यानंतर आता त्याने आपला मोर्चा ग्रामीण भागाकडे वळवला आहे. त्यामुळे ग्रामीण भागामध्ये कोरोनाबाधित असणाऱ्या क्षेत्रातील प्राथमिक आरोग्य केंद्रांत जास्त वैद्यकीय अधिकारी ठेवण्याचा निर्णय पुणे जिल्हा परिषदेने घेतला आहे. यासाठी पुणे जिल्ह्यातील सहा वैद्यकीय अधिकाऱ्यांना कोरोनाबाधित क्षेत्रातील प्राथमिक आरोग्य केंद्रात रुजू करण्यात आले आहे. हे सर्व वैद्यकीय अधिकारी आज बुधवारी दिलेल्या ठिकाणी दाखल झाले आहेत. या नियुक्त्या विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांच्या आदेशाने केल्या असून  कोरोनाची व्हायरस हद्दपार होईपर्यंतच या नियुक्त्या असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी काढलेल्या आदेशामध्ये नमूद करण्यात आले आहे.

● नियुक्त्या करण्यात आलेले अधिकारी आणि त्यांचे तालुके खालील प्रमाणे आहेत…

◆ दौंड, खामगाव, खेड प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ.विलास माने यांची याच तालुक्यात संक्रमणशील क्षेत्रात नियुक्ती केली आहे.

◆ शिरूर तालुक्यामध्ये कार्यरत असणारे टाकळी हाजी येथील डॉ. कृष्णा चव्हाण यांची तळेगाव ढमढेरे येथे तर हवेली तालुक्यात असणाऱ्या ऊरळीकांचन येथील डॉ. संजीव सोनवणे यांची या भागात असणाऱ्या कोरोना बाधित क्षेत्रासाठी नियुक्ती करण्यात आली आहे.

◆ मुळशी तालुक्यातील मुठा प्राथमिक आरोग्य केंद्रात असणाऱ्या वैद्यकीय अधिकारी डॉ.गौरव हजारी आणि पुरंदर तालुक्यातील वाल्हा येथील डॉ. आदित्य धारुरकर यांची नियुक्ती हवेली तालुक्यातील खानापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात केली गेली आहे आहे.

 ◆आंबेगाव तालुक्यात असणाऱ्या पेठ येथील डॉ. परेश पोटे यांची हवेली तालुक्यातील वाघोली प्राथमिक आरोग्य केंद्रात नियुक्ती करण्यात आली आहे.