ganesh festival – देऊळगाव गाडा येथील कोविड सेंटरमध्ये आमदार राहुलदादा कुल यांच्या हस्ते गणपती बाप्पा ची स्थापना



|सहकारनामा|  

दौंड : दिपगृह अकॅडेमी, देऊळगाव गाडा ता.दौंड येथील आपल्या अद्ययावत डेडिकेटेड कोव्हीड केअर व हेल्थ सेंटरमध्ये आज विघ्नहर्ता गणरायाची विधिवत स्थापना करण्यात आली. 

यावेळी कोरोनाचे आरिष्ट लवकर हटू दे सर्वांना सुख, समाधान व उत्तम आरोग्य लाभुदे अशी प्रार्थना आमदार राहुल कुल यांनी गणराया चरणी केली. 

यावेळी कोविड सेंटरमध्ये कोविड रुग्णांच्या सेवेसाठी कार्यरत असलेले डॉक्टर्स, परिचारक, परिचारिका, निम वैद्यकीय स्टाफ, सफाई कर्मचारी, पत्रकार बांधव, कोव्हीड केअर सेंटरच्या व्यवस्थापन समितीचे सर्व सहकारी उपस्थित होते.