फरार आरोपींना मदत करणाऱ्या दहा जणांवर गुन्हा दाखल, आठ जणांना बारामती पोलिसांकडून अटक



बारामती : सहकारनामा ऑनलाईन

इंदापूर तालुक्यातील भिगवण पोलीस ठाण्यामध्ये भादवि कलम ३०७, ३९७, ३२३, ५०४, ५०६, ३४ सह आर्म अॅक्ट कलम ३/२५ व ४/२५ नुसार दि. ०१ फेब्रुवारी २०२० रोजी गुन्हा दाखल असुन हयातील आरोपी क्र. ०१ बाळा उर्फ जगदीश पोपट दराडे (रा. अकोले ता. इंदापूर हल्ली रा. वंजारवाडी ता. बारामती जि. पुणे) ०२) विजय

बाळासो गोफणे (रा.वंजारवाडी ता बारामती) हे गुन्हा घडले पासुन अटक चुकवित होते. सदर आरोपी नमुद गुन्हयामध्ये आरोपी असुन ते पाहीजे असले बाबत पोलीस स्टेशन कडुन शोधपत्रक प्रसिध्द करण्यात आले होते. तसेच याबाबत  वर्तमानपत्रातुन त्यांची नावे प्रसिध्द झाली होती. वरील आरोपी यांचे विरूध्द भिगवण व बारामती येथे गुन्हे दाखल आहेत व ते अपराधी आहेत हे माहीत असुन सुध्दा कायदेशीर शिक्षेपासुन वाचवण्यासाठी त्यांना पैसे, जेवन, औषधे पुरवुन स्वत:चे घरात व शेतात ठेवुन घेउन त्यांना आश्रय दिला म्हणुन यातील आरोपी क्र. ०१) वामन विट्टल दराडे (रा. निरगुडे ता. इंदापूर) २) लक्ष्मण हुणमंत नरुटे (रा. काझड ता. इंदापूर) ३) विशाल बाळासो घोळवे (रा. निंबोडी ता. बारामती)

४) संजय राजाराम वेदपाठक (रा. श्रावण गल्ली ता. बारामती) ५) नाना विश्वंभर कांबळे (रा. पतंगशहा बारामती) ६) अक्षय अंकुश कोकरे (रा.पणदरे ता. बारामती) ७) जयदीप पोपट दराडे (रा.अकाले ता. इंदापूर) ८) सुरज संतोष दराडे (रा. अकाले ता. इंदापूर) ९) नाथा मोहन दराडे (रा.अकाले ता. इंदापूर) १०) विजय खाडे उर्फ आबा (रा.रूई ता. बारामती) यांनी बाळा दराडे व विजय गोफणे यांना आश्रय दिला म्हणुन त्यांचेविरूध्द भिगवण पोलीस ठाणे येथे भा. दं. वि. कलम २१२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन यातील आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे. सदरची कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अपर पोलीस अधीक्षक जयंत

मीना, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या  मार्गदर्शनाखाली बारामती तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप, सहा. पोलीस निरीक्षक  जीवन माने यांनी केली आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोहवा संदीप कारंडे हे करीत आहेत.

यातील आरोपी बाळा पोपट दराडे याची माहिती देणा-याचे नाव गोपनिय ठेवण्यात येईल व त्यास योग्य ते बक्षीस देण्यात येईल असे आवाहन पोलिसांनी केले असून ज्यांनी  बाळा दराडे यास यापुर्वी आश्रय दिलेला आहे व आताही देत आहेत त्यांचे विरूध्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी माहिती दिली. आरोपी बाळा दराडे बाबत माहीती असल्यास खालील नंबरवर संपर्क करावा माहीती देणा-याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल असेही आवाहन पोलिसांनी केले आहे.

१) जीवन माने, सहा. पोलीस निरीक्षक भिगवण पोस्टे. मो. नं. ९५३४५५३३००

२) रियाज शेख , पोलीस उप निरीक्षक, भिगवण पोस्टे मो. नं. ८६०५०५७७८८