इंदापूरकरांना दिलासा, 12 जणांचा अहवाल निगेटिव्ह



इंदापूर : सहकारनामा ऑनलाईन

इंदापूरच्या जंक्शन आणि लाकडी येथील कोरोना बधितांच्या संपर्कामध्ये आढळून आलेल्या बारा जणांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.

या सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने इंदापूरकरांना दिलासा मिळाला आहे.

इंदापूरच्या शेळगाव आणि जंक्शन येथील कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या आठ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता तेव्हापासून या भागातील नागरिक चिंतीत होते.

नागरिकांनी घाबरु नये व  योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेखा पोळ यांनी केले आहे.