आंतराष्ट्रीय :
पाकिस्तानमध्ये तिरंगा झळकला आहे या वृत्तावर विश्वास बसत नाही ना? होय, पण हे खरं आहे. भारताविरुद्ध कायम कुरखोड्या करणाऱ्या पाकिस्तानला या प्रकरणामुळे चांगलाच झटका बसला आहे.
तर घडले असे की पाकिस्तानचे प्रसिद्ध न्यूज चॅनेल असलेले ‛डॉन’ वर रविवारी दुपारी अचानक भारताचा तिरंगा फडकू लागला आणि स्वतंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा असा मेसेजही झळकू लागला असे वृत्त समोर येत आहे. या न्यूज चॅनेलची संपूर्ण यंत्रणा हॅक करण्यात आली अशी माहिती दिली जात आहे.
रविवारी दुपारी हे चॅनेल सुरू असताना या चॅनेलचे प्रसारण थांबले आणि भारताचा ध्वज त्यावर तिरंगा फडकू लागला. या घडलेल्या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ नेटकऱ्यांकडून सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले आहेत.
यानंतर पाकिस्तानी मीडियातून ही सिस्टम हॅक करण्याचा हॅकर्सचा हेतू असावा अशी माहिती दिली गेली आहे. घडलेल्या या घटनेनंतर पाकिस्तान्यांमधून कमालीचा संताप व्यक्त करण्यात येत आहे.ट्विटर आणि सोशल मीडियावर पाकिस्तानी आपला राग व्यक्त करताना दिसत आहेत. भारताच्या नावाने खडे फोडणाऱ्या पाकिस्तानच्या थेट मुख्य वृत्तवाहिनी पैकी एक असणाऱ्या या चॅनेलवरच भारताचा तिरंगा झळकल्याने पाकिस्तानमध्ये खळबळ माजली आहे.