आंतरराष्ट्रीय –
जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाने आता पुन्हा एकदा आपले उग्ररुप दाखविण्यास सुरुवात केली आहे. आणि याची सुरुवात ब्रिटनसारख्या प्रगत राष्ट्रामधून होत असल्याचे समोर येत आहे.
ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसची पुन्हा दुसरी लाट सुरू झाली असल्याने ब्रिटनची वाटचाल पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या दिशेने सुरु झाली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ब्रिटनमध्ये लवकरच निर्बंध लागू होणार असल्याचे तेथील पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी जाहीर केले आहे.
कोरोनाच्या विळख्यात सध्या संपूर्ण जग सापडले आहे. अनेक देशांमध्ये लॉकडाउन सुरू असून भारतासह काही देशांनी अनलॉकडाउन कडे वाटचाल सुरू केली आहे, मात्र ब्रिटनमध्ये पुन्हा कोरोनाची दुसरी लाट आली असल्याने अन्य देशांच्या चिंता वाढल्या आहेत.
सध्या ब्रिटनचा बधितांचा आकडा हा 3 लाख 98 हजरांच्या पुढे असून तेथे कोरोनामुळे आत्तापर्यंत 41 हजारांच्या पुढे नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
ब्रिटन कोरोनातून मुक्त होत असतानाच पुन्हा दुसरी लाट आल्याने तेथे एक आठवड्यात हजारोंनी पुन्हा रुग्ण वाढू लागले आहेत.
वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते हि कोरोनाची दुसरी लाट असून त्यामुळे तेथील पंतप्रधानांनी तातडीची बैठक बोलावून देशात पुन्हा लॉकडाऊन जाहीर करण्याचे संकेत दिले आहेत.