Daund : दौंड शहरातील हे महत्वाचे रस्ते होणार वाहतुकीसाठी खुले, आमदार राहुल कुल यांची माहिती



दौंड : सहकारनामा ऑनलाइन

नगरोत्थान योजनेद्वारे दौंड शहरातील बाजारपेठेतील प्रमुख रस्त्यांचे संपूर्ण काँक्रीटीकरण करण्याचे काम सुरु आहे या कामांची पाहणी दौंडचे आमदार राहुल कुल यांनी केली.

यातील कुरकुंभ मोरी ते गांधी चौक, हुतात्मा चौक -आंबेडकर चौक ते गांधी चौक या रस्त्याचे काम अंतिम टप्यात असून लवकरच हा रस्ता वाहतुकीसाठी खुला होईल अशी माहिती यावेळी आ.कुल यांनी दिली. नवीन पाणी पुरवठा योजनेसाठी जलवाहिन्या ,भूमीगत वीज वाहिन्या, कुरकुंभ मोरीसाठी ४ फूट व्यासाची भूमिगत सांडपाणी वाहिनी, ठिकठिकाणी वाहतुकीला अडथळा असणारे विजेचे खांब हलविणे, रोहित्रे हलविणे आदी जटिल व वर्षानुवर्षे प्रलंबित असणारी कामे देखील हाती घेण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. 

आपल्या प्रयत्नांतून अष्टविनायक मार्ग, राज्य महामार्ग व रस्ते विकास महामंडळाचा माध्यमातून शहराला जोडणाऱ्या सर्व रस्त्यांची व शहरातील सर्व प्रमुख व लहानमोठ्या रस्त्यांची कामे होत आहेत याद्वारे शहरातील  रस्त्यांच चित्र बदलून वाहतूक सुरळीत होइल तर सिमेंट काँक्रीटचा रस्त्यामुळे नित्याची धूळ, खड्डे, वाहतूक कोंडी याद्वारे नागरिकांची सुटका होणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

या पाहणीवेळी बाजारपेठेतील व्यापारी बंधूंशी संवाद साधत त्यांच्या सूचना समस्या त्यांनी समजावून घेतल्या. यावेळी ज्येष्ठ मार्गदर्शक, माजी नगराध्यक्ष श्री. प्रेमसुखजी कटारिया, नागरिक हित संरक्षक मंडळाचे कार्याध्यक्ष श्री.योगेश कटारिया, भाजप तालुकाध्यक्ष श्री. माउली ताकवणे, भाजप शहराध्यक्ष श्री. फिरोज खान, श्री.सुनील शर्मा, श्री.हरिभाऊ ठोंबरे, नगरसेवक शाहनवाज पठाण तसेच दौंड शहरातील त्यांचे सहकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.