इंडियन आयडल 3 चा विनर प्रशांत तमांग चे अचानक निधन

नवी दिल्ली : मनोरंजन विश्वाला धक्का देणारी हृदयद्रावक अशी बातमी समोर आली आहे. इंडियन आयडल ३ चे विजेते प्रशांत तमांग यांचे वयाच्या ४३ व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे.

गायक आणि अभिनेता असलेल्या प्रशांत तमांग याने आपल्या गायकीने अनेकांची मने जिंकली होती. तो गायकसह एक उत्कृष्ट अभिनेताही होता. अश्या या प्रतिभावान आणि कुशल कलाकाराच्या अचानक निधनाने संपूर्ण कलाविश्वात शोक व्यक्त केला जात आहे.

जवळच्या मित्राने केली मृत्यूची पुष्टी

प्रशांत यांचे मित्र आणि भागीदार भावेन धनक यांनी इंस्टाग्रामवर पोस्टमध्ये दुःख व्यक्त करताना तमांग यांच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला आणि आपले दुःख व्यक्त करत ‘माझ्या भावा, तू गेलास यावर माझा विश्वास बसत नाही’ अशी पोस्ट केली. मिळालेल्या अधिक वृत्तानुसार, प्रशांत तमांग यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते दिल्लीतील जनकपुरी येथील त्यांच्या घरी असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांची प्रकृती बिघडली तेव्हा त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.