केडगाव चौफुला रोडवर कार चा भीषण अपघात.. एकजण जागीच ठार तर एक जखमी

केडगाव (दौंड) : दौंड तालुक्यातील केडगाव – चौफुला रोडवर भीषण अपघात घडला असून या अपघातामध्ये केडगाव येथील एक युवक जागीच  ठार झाला असून एकजण जखमी झाला आहे. कार या रस्त्यावरील बोरमलनाथ ओढ्यात पलटी झाल्याने कार चा अक्षरशा चक्काचूर झाला असून कार ची अवस्था पाहून अपघाताची भीषणता लक्षात येते.

सार्थक बारवकर असे या अपघातामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या युवकाचे नाव असून तो केडगाव येथील रहिवासी होता तर सार्थक कडू असे जखमी युवकाचे नाव असून त्याच्यावर चौफुला येथील खाजगी रुग्णालयात सध्या उपचार सुरु आहे.

सार्थक बारवकर आणि सार्थक कडू हे दोघेही ११ वी मध्ये एकत्र शिक्षण घेत होते. दोघे जिवलग मित्र होते. केडगाव – चौफुला प्रवासादरम्यान त्यांच्या वाहनाला मोठा अपघात होऊन यात सार्थक बारवकर याचा जागीच मृत्यू झाला आहे. या युवकांच्या कार ला अपघात झाल्याची खबर मिळताच केडगाव येथील नागरिकांनी चौफुला हॉस्पिटल परिसरात गर्दी केली होती.