लोणीकाळभोर : सहकारनामा प्रतिनिधी (बापू धुमाळ)
लोणीकाळभोर पोलिस स्टेशन परिसरात आमंली पदार्थ विक्री करणारा इसम स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून जेरबंद करण्यात आला असून त्याच्या कडून ६ ग्रॅम ८५० मिली वजनाचे ५४,८०० रुपये किंमतीचे मेफेड्रोन (ड्रग्स) जप्त करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिस अधिक्षक अभिनव देशमुख यांच्या आदेशाने पुणे सोलापुर महामार्गावरील लोणी काळभोर पोलिस स्टेशन परिसरात पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय बातमीदार मार्फत मिळालेल्या माहिती वरून लोणीकाळभोर टोल नाका परिसरात एक इसम मैफड्रोन (ड्रग्स) नावाचा अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी येणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली होती.
या माहितीवरून सदर टोल नाक्यावर सापळा रचून एक इसमास ताब्यात घेण्यात आले. जेरबंद करण्यात आलेल्या आरोपीचे नाव किट्टू पुजारी (वय ४७ वर्षे सध्या रा.गंगाधाम कासा, ग्रीन सोसायटी कात्रज पुणे, मूळ रा. राजरामोहन रॉय कामा बाग समोर गिरगाव मुंबई) असे असून त्याची झडती घेतली असता त्याच्या पॅन्टच्या खिश्यात प्लास्टिकच्या पुडी मध्ये मेफेड्रोन (ड्रग्स) नावाचा अंमली पदार्थ मिळून आला. संबंधित आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी व मुद्देमाल पुढील तपास कामी लोणीकळभोर पोलिस स्टेशनच्या ताब्यात दिले आहे.
सदरची कारवाई ही पोलिस अधिक्षक अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलिस अधिक्षक विवेक पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी हवेली विभाग सई भोरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ट पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट, पोलिस उप.नि.शिवाजी ननावरे, पो.हवा राजेंद्र पुणेकर, पो.ना.विजय कांचन, पो. कॉ.धिरज जाधव, पो कॉ अक्षय नवले यांनी केली आहे.