BREAKING NEWS : केडगाव, देऊळगाव, राहू, यवतमध्ये 5 जणांना कोरोनाची लागण, 5 जणांमध्ये 3 शिक्षकांचा समावेश



दौंड : सहकारनामा ऑनलाइन (अब्बास शेख)

दौंड तालुक्यामध्ये पुन्हा एकदा कोरोनाने आपले जाळे पसरविण्यास सुरुवात केली असून केडगाव, यवत, देऊळगाव गाडा, आणि राहू असे 5 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. या 5 पैकी 3  शिक्षक असून त्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे अशी माहिती यवत ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.इरवाडकर यांनी सहकारनामा’ला दिली.

दि.19/11/2020 रोजी 179 जणांची कोरोना टेस्ट करण्यात आली होती त्यामध्ये राहू येथील महिला शिक्षिका पॉझिटिव्ह आल्या होत्या.

तर दि. 20 रोजी 262 जणांची कोरोना टेस्ट करण्यात आली त्यामध्ये केडगाव मधील एक महिला शिक्षिका, देऊळगाव गाडा मधील एक पुरुष शिक्षक तसेच राहू आणि यवत मधील दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे.

दोन दिवसांत पाच कोरोना बाधित आढळून आले असून त्यामध्ये तीन शिक्षकांचा समावेश असल्याने येथील नागरिकांच्या चिंता वाढल्या आहेत.