केडगाव : केडगाव आणि चौफुला परिसरात आज दि.20 नोव्हेंबर रोजी दुपारी बारा वाजल्यापासून एअरटेल (Airtel)ची रेंज गायब झाली आहे. यामुळे येथील हजारो एअरटेल (Airtel) ग्राहकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला आहे. रात्री साडेआठ वाजले तरीही रेंज (Range) आलेली नसल्याने फोन न लागणे, बोलणे न होणे, इंटरनेट ठप्पा अश्या अनेक समस्यांचा सामना येथील एअरटेल चे ग्राहक करीत आहेत.

केडगाव गांव आणि परिसरामध्ये कायमच एअरटेल ची रेंज गायब होण्याचे प्रकार घडत असतात. लाईट गेल्यानंतर काही तासांत एअरटेल टॉवर बंद पडते आणि नंतर मात्र फोन न लागणे आणि इंटरनेट बंद पडणे असले प्रकार सुरु होतात. या ठिकाणी हजारो लोक एअरटेल चे सिमकार्ड वापरतात मात्र एअरटेल च्या अश्या धरसोड वृत्तीमुळे आता अनेकजण आपले सिम पोर्ट करु लागले आहेत.
आज गुरवार दि.20 नोव्हेंबर रोजी तर एअरटेलने कहरच केला असून दुपारी बारा वाजता गेलेली रेंज रात्रीचे साडेआठ वाजले तरीही मोबाईलला रेंज नव्हती. दिवसभर लोकांचे आउटगोईंग आणि इनकमिंग बंद होते. या सर्व प्रकाराने एअरटेल सिम वापरणारे ग्राहक चांगलेच त्रस्त झाल्याचे दिसत होते. एअरटेल आपली सर्व्हिस सुधारत नसल्याने आता लोकांनी जीवो किंवा वोडाफोन मध्ये आपले सिमकार्ड पोर्ट करण्यास सुरुवात केली आहे.







