अब्बास शेख

केडगाव, दौंड : दौंड तालुक्यातील केडगाव चौफुला येथे शेतकऱ्याकडून लाच घेताना देलवडी (ता.दौंड) येथील तलाठी दिपक नवनाथ आजबे वय 39सजा देलवडी रा.केडगाव, आनंद हेरिटेज बिल्डिंग ता.दौंड)
मिळालेल्या माहितीनुसार यातील तक्रारदार हे व्यवसायाने शेतकरी असून त्यांनी 2012 साली देलवडी, ता.दौंड येथे गट क्र. 1506 मधील 0.06 आर क्षेत्र खरेदी केलेले असून तसा महसूल दप्तरी 7/12 वर नोंदी झालेल्या आहेत. जुलै 2024 मध्ये तक्रारदार यांनी जमिनीचा संगणकीय 7/12 उतारा काढला असता त्यावर तक्रारदार यांचे नावे 0.06 आर ऐवजी 0.03 आर क्षेत्र नोंद दिसून आल्याने तक्रारदार यांनी संगणकीय 7/12 वर दरुस्ती होणेकारिता दि. 7/8/2024 रोजी आलोसे तलाठी दीपक आजबे यांचेकडे लेखी अर्ज केला होता.
त्यानंतर वेळोवेळी तक्रारदार हे सातबारा उताऱ्यावरील दरुस्ती होण्याकरीता आलोसे यांची वारंवार भेट घेत होते तेव्हा आलोसे हे तक्रारदारांना काम करून देण्याचे आश्वासन देत होते. सप्टेंबर 2025 मध्ये तक्रारदार यांच्या संगणकीय 7/12 उताऱ्यावर दुरुस्ती करण्याकरीता आलोसे यांनी तक्रारदारांकडून हस्तलिखित 7/12 उताऱ्याची प्रत मागितली तेव्हा तक्रारदार यांनी ती हस्तलिखित प्रत तहसीलदार कार्यालयातून प्राप्त करून तलाठी आजबे यांना दिली.
त्यावेळी त्यांनी तक्रारदाराच्या संगणकीय 7/12 वर दुस्रती करण्यासाठी प्रस्ताव तयार करून तो प्रस्ताव तहसीलदार यांच्याकडे पाठवण्यासाठी तक्रारदाराकडे 4 लाख रुपयांची मागणी केल्याबाबतची तक्रार तक्रारदार यांनी ए.सी.बी.कार्यालय, पुणे येथे दिली होती.
तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने दि. 7/11/2025 व दि. 10/11/2025 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच मागणीबाबत पडताळणी कारवाई केली असता दि. 7/11/2025 रोजीच्या पडताळणीमध्ये आलोसे यांनी तक्रारदाराच्या वरील कामासाठी तक्रारदाकडे 3 लाखाची लाचेची मागणी करून 2.5 लाख स्वीकारण्याची तयारी दर्शवल्याचे निष्पन्न झाले. तसेच दि.10/11/2025 रोजी पडताळणी मध्ये आलोसे यांनी 2 लाख 50 हजाराची मागणी करून तडजोडी अंती 2 लाख स्वीकारण्याची तयारी दर्शवल्याचे निष्पन्न झाले.
दि.10/11/2025 रोजी 05:45 वाजता करण्यात आलेल्या सापळा कारवाई दरम्यान यातील आरोपी लोकसेवक दीपक आजबे (तलाठी सजा-देलवडी यांनी साईराज कॅन्टीन केडगाव चौफुला ता.दौंड येथे तक्रारदाराकडून 2 लाख रुपयांची लाच स्वीकारली असता रंगेहात पकडण्यात आले आहे. त्यांच्याविस्द्ध यवत पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.







