दोन आठवड्यांमध्ये जिल्हापरिषद निवडणुकीच्या तारखेची घोषणा होणार

मुंबई :  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर महानगरपालिका निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. तर जिल्हापरिषद आणि पंचायत समितीच्या तारखाही येत्या दोन आठवड्यांमध्ये जाहीर होणार असल्याची माहिती मिळत आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कालावधी संपल्यानंतर तब्बल तीन वर्षे या निवडणूका प्रलंबित होत्या. त्यामुळे या निवडणूका कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. 2022 साली निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर अनेकांनी निवडणुकीची तयारी सुरु केली होती मात्र ओबीसी जागेंचा वाद कोर्टात पोहोचल्याने या निवडणूका लांबणीवर पडल्या होत्या.

आता महानगर पालिका निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर, जिल्हापरिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक तारखाही दोन आठवड्यांमध्ये जाहीर होणार असल्याची माहिती मिळत आहे.