राहू-खामगाव गटामध्ये युवकांमधून प्रशांत हंबीर तर जेष्ठांमधून सरपंच दिलीप देशमुख यांची नावे आघाडीवर, थोरात गटातही या नावांना सर्वाधिक पसंती

राहू : दौंड तालुक्यातील राहू खामगाव जिल्हापरिषद गटामध्ये सध्या कुल आणि थोरात यांच्या गटातील संभाव्य उमेदवारांच्या नावांची मोठी चर्चा पहायला मिळत आहे. राहू गटामध्ये सर्वसाधारण असे आरक्षण निघाले असून या जिल्हा परिषद गटासाठी दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी युवावर्गाला संधी द्यावी अशी जोरदार मागणी होताना दिसत आहे.

राहू खामगाव गटात सध्या कुलगटाचे युवा कार्यकर्ते प्रशांत हंबीर यांचे नाव आघाडीवर दिसत आहे तर जेष्ठांमधून राहू चे विद्यमान सरपंच दिलीप देशमुख यांचेही नाव आघाडीवर दिसत आहे. या दोन्ही नावानंतर कुल गटातून गणेश चव्हाण, संदीप नवले, सचिन शेलार, बाळासाहेब पिलाणे, लक्ष्मण कदम, माजी चेअरमन राहू विकास पांडुरंग सोनवणे, चंद्रकांत सोनवणे, प्रकाश सोनवणे, दिंगबर मगर, डॉक्टर संदीप खेडेकर इत्यादिंची नावे चर्चेत आहेत.

राष्ट्रवादीकडूनही अनेकजण इच्छुक असून यामध्ये वैशालीताई नागवडे आणि थोरात गटाचे मिरवडीचे माजी सरपंच सागर शेलार यांची नावे प्रकर्षाने घेतली जात असून त्या खालोखाल दत्तोबा तांबे, भगवान मेमाणे इत्यादिंची नावेही पुढे येत आहेत. राहू हा आमदार राहुल कुल यांचा बालेकिल्ला मानला जातो. या ठिकाणी कुल जो उमेदवार देतील तो निवडून येतो असा इतिहास आहे त्यामुळे कुल गटाकडून यावेळी युवकांना संधी देण्यात यावी अशी मागणी युवावर्गातून होत असून प्रशांत हंबीर यांच्या नावाला युवावर्गातून सर्वात जास्त प्रतिसाद मिळत आहे.