अब्बास शेख
दौंड : दौंड तालुक्यातील खडकी देऊळगाव राजे जिल्हापरिषद गटात सर्वसाधारण आरक्षण जाहीर झाल्यानंतर आता निवडणुकीच्या तयारीला वेग आला आहे. या गटामध्ये राष्ट्रवादी अजितदादा गटाकडून विरधवल जगदाळे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून आप्पासाहेब पवार आणि भाजपकडून केशव काळे, ॲड.प्रशांत गिरमकर आणि गणेश गायकवाड यांच्या नावाची सर्वात जास्त चर्चा होताना दिसत आहे.

खडकी देऊळगाव राजे गटात यावेळी काटे की टक्कर पहायला मिळणार आहे त्यामुळे भाजप सुद्धा या ठिकाणी आपला तगडा उमेदवार देण्याच्या तयारीत आहे. अप्पासाहेब पवार, विरधवल जगदाळे यांचा बालेकिल्ला हा देऊळगाव राजे, शिरापूर त्या आसपासची इतर महत्वाची गावे असल्याने भाजपकडून सुद्धा या ठिकाणी दुसऱ्या परिसरातील उमेदवार देण्यापेक्षा याच परिसरातील उमेदवार देण्यात यावा अशी मागणी होत आहे. भाजपकडून या ठिकाणी केशव काळे, ॲड.प्रशांत गिरमकर आणि गणेश गायकवाड यांची नावे सर्वात जास्त चर्चेत दिसत आहेत तर खडकी येथून संजय काळभोर यांचे नावही घेतले जात आहे.
विरधवल जगदाळे आणि अप्पासाहेब पवार यांना भाजपकडून केशव काळे किंवा ॲड.प्रशांत गिरमकर हे सर्वात जास्त काटे की टक्कर देऊ शकतात अशी चर्चा या परिसरात रंगत आहे. भाजप च्या या दोघांनीही या अगोदर राजकारणात आपला ठसा उमटवला आहे.
वासुदेव काळे यांच्या भूमिकेकडे लक्ष भाजप चे जेष्ठ नेते वासुदेव काळे यांच्या भूमिकेकडे येथे लक्ष लागून राहिले आहे, कारण शिरापूर हे वासुदेव काळे यांचे गाव असून ते या गटातून अगोदर जिल्हापरिषद सदस्य म्हणून निवडून गेलेले आहेत त्यामुळे आता या ठिकाणी त्यांचे पुतणे केशव काळे हे पुन्हा एकदा निवडणुकीच्या तयारीला लागल्याचे दिसत असून या गटात सर्वात जास्त चर्चा ही केशव काळे आणि ॲड.प्रशांत गिरमकर यांच्या नावाची होताना दिसत आहे.







