Breaking | बोरीऐंदी येथून यवत पोलिसांनी केला 28 लाखांचा गुटखा जप्त

यवत : दौंड तालुक्यातील बोरीऐंदी येथून सुमारे 27 लाख 97 हजार 624 रुपयांचा अवैध गुटखा यवत पोलिसांनी जप्त केला आहे. यावेळी यातील आरोपी नवनाथ रतन झुरुंगे (रा.झुरुंगे वस्ती, बोरीऐंदी ता.दौंड,पुणे) याच्यावर यवत पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आला आहे. याबाबत यवत पोलिस स्टेशनचे हवालदार मोहम्मद अली मड्डी यांनी फिर्याद दिली आहे.

दि.९ ऑक्टोबर रोजी hi कारवाई करण्यात आली असून यातील आरोपी नवनाथ रतन झुरंगे  याने आपल्या राहत्या घराचे समोर पत्र्याचे खोलीमध्ये आर. एम. डी. पान मसाला व तंबाखुचे बॉक्स, डायरेक्टर पान मसाला व शॉट ९९९ तंबाखु, विमल पान मसाला व तंबाखुचे बॉक्स असा एकूण 27 लाख 97 हजार 634 रुपये किंमतीचा माल साठवुन ठेवला होता.

आरोपीच्या घराजवळ पकडण्यात आलेला गुटखा

त्यामुळे आरोपीने महाराष्ट्र राज्याचे अन्न मुरक्षा आयुक्त यांचे प्रतिबंधक आदेशान्वये महाराष्ट्र राज्यात गुटखा पानमसाला अथवा गुटखा किंवा पान मसाला गठीत होवु शकेल असा पदार्थ सुंगधीत किंवा स्वादिष्ट सुपारी तंबाखु इ. उत्पादन/ साठा वितरण वाहतुक तसेच विक्री यावर बंदी घातलेल्या आदेशाचे उल्लंघन केले आहे. सदर प्रतिबंधीत साठा हा जन आरोग्याचे दृष्टीने असुरक्षित आहे.

शासनाने त्याची विक्री वाहतुक, साठा, वितरण  करीता प्रतिबंध केला आहे. सदर गुट़खा सेवन केल्यामले मुखाच्या कर्करोगासारखे आजार होवुन शारीरिक हानी होवुन इतरांचे जीवित धोक्यात येत असल्याने भारतीय न्याय संहिताच्या विविध कलमान्वये व अन्न सुरक्षा व मानक कायदा सन 2006 चे कलमाचे उत्लंघन केले आहे. त्यामुळे आरोपीवर गुन्हा दाखल कारण्यात आला आहे. ही संपूर्ण कारवाई यवतचे पोलिस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विजय कोल्हे करीत आहेत.