आता ‘अँटी करप्शन’ आपल्या दारी उपक्रम

पुणे : जर तुम्हाला कोणी लाच मागत असेल किंवा मध्यस्ती व्यक्ती एखाद्या अधिकाऱ्यासाठी लाच घेत असेल तर अश्या लोकांची तक्रार तुम्ही पुण्यात जावून अँटी करप्शन ब्युरोला करण्यापेक्षा आता अँटी करप्शन ब्युरो च तुमच्या दारी येत आहे. 

दिनांक 13/10/2025 ते 16/10/2025 या कालावधीत संपूर्ण पुणे जिल्हयात अँटी करप्शन कायद्याबाबत ‘जनजागृती’ करण्यात  येणार आहे. या जनजागृती कार्यक्रमादरम्यान अँटी करप्शन चे अधिकारी खाली दिलेल्या तारखेला तुमच्या तालुक्यात असणाऱ्या शासकीय गेस्ट हाऊसमध्ये त्यांच्या टीमसहीत हजर राहून त्या परिसरातील समाजसेवक, अशासकीय संस्थेचे पदाधिकारी तसेच अँटी करप्शन ब्युरोचे यापुर्वीचे तक्रारदार यांच्या भेटी घेऊन त्यांच्या तक्रारी आणि गाऱ्हाने बदल ऐकुण घेणार आहेत.

त्यामुळे पुणे जिल्ह्यातील त्या त्या परिसरातील सर्व नागरिकांना अँटी करप्शन ब्युरो विभागाच्या वतीने आवाहन करण्यात आले असून लोकसेवक, शासकीय अधिकारी, कर्मचारी किंवा त्यांच्यावतीने खाजगी इसम (एजंट) हे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास अँटी करप्शन ब्युरोच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन आपली तक्रार दिल्यास आपली तक्रार स्विकारून लागलीच पुढील कार्यवाही केली जाणार आहे.