बोरिपार्धी ग्रामपंचायत उपसरपंच निवडणुकीत मोठा ट्वीस्ट.. समांतर मते मिळून सुद्धा अखेरच्या क्षणी उपसरपंच पदाची माळ शर्मा यांच्या गळ्यात

केडगाव : दौंड तालुक्यातील बोरीपार्धी ग्रामपंचायत उपसरपंच निवडणुकीत मोठी चुरस पहायला मिळाली. दोन्ही बाजूला समांतर मते पडल्याने ऐनवेळी चिठठी काढून उपसरपंच निवड करण्यात आली.

दि. 29 सप्टेंबर 2025 रोजी बोरिपार्धी येथील उपरपंच निवडणूक पार पडली. ग्रामविकास अधिकारी मुरलीधर तुकाराम बडे आणि सरपंच बाळासाहेब दशरथ सोडनवर यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक पार पडली. बोरीपार्धी ग्रामपंचायत सदस्य संख्या 17 असल्यामुळे उपसरपंच पदासाठी सरला राजेंद्र शर्मा व अशोक अडसूळ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मतदान प्रक्रिया सुरु झाल्यानंतर दोन्ही उमेदवारांना समांतर आठ आठ मते पडली तर एक मतदान बाद झाले.

यावेळी निवडणूक अधिकारी बडे यांनी सर्वानुमते शाळेतील एका विद्यार्थ्याला बोलावून चिठ्ठी काढण्यास सांगितली. यावेळी सरला राजेंद्र शर्मा यांच्या नावाची चिठ्ठी निघाल्यामुळे त्यांची उपसरपंच म्हणून निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. सरला राजेंद्र शर्मा यांनी या अगोदर बोरिपार्धी ग्रामपंचायत चे सरपंच पद सुद्धा भूषविले आहे.