पुणे : सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या राज्यातील 34 जिल्हापरिषदांच्या अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाले असून पुणे जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण हे सर्वसाधारण निघाल्याचे जाहीर करण्यात आले आहे. हे आरक्षण जाहिर झाल्यानंतर आता गट आणि गणांच्या आरक्षणाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले असून हे आरक्षण नेमके कधी जाहीर होणार हे आता आपण सूत्रांच्या हवाल्याने पुढे पाहणार आहोत.
2017 साली झालेल्या जिल्हापरिषद निवडणुकीनंतर तब्बल आठ वर्षांनी ही जिल्हापरिषदची निवडणूक होत आहे. त्यामुळे सर्वांच्याच नजरा आता गट आणि गणांच्या आरक्षण सोडतीकडे लागल्या आहेत. 2022 साली आरक्षण सोडत जाहीर झाली होती मात्र पुन्हा या निवडणूका पुढे गेल्याने गट आणि गणांची विभाग रचना आणि आरक्षण सोडत यातही बदल झाला आहे.
पुणे जिल्ह्यातील जिल्हापरिषद गट आणि गणांची आरक्षण सोडत ही येणाऱ्या बुधवारी जाहीर होण्याची शक्यता सूत्रांच्या हवाल्याने मिळत आहे. गट आणि गणांचे आरक्षण झाल्यानंतर खऱ्या अर्थाने निवडणुकीला रंगत येणार आहे. जिल्हापरिषद निवडणुकीसाठी अनेकजण इच्छुक असून नेमकं कोणत्या गटात काय आरक्षण निघते याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.