वरवंड (दौंड) : दौंड तालुक्यातील सिध्दीराज मंगल कार्यालय वरवंड या ठिकाणी किर्ती स्टोअर्स व दौंड तालुका फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीने फोटोग्राफर बांधवांसाठी महामेळावा आयोजित करण्यात आला होता.
या मेळाव्यासाठी दौंड, हडपसर, लोणी, ऊरूळी कांचन आणि कर्जत तालुक्यातील फोटोग्राफर बांधवांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवला. यावेळी कीर्ती स्टोअर्सकडून फोटोग्राफिसाठी लागणारे विविध कॅमेरे, ट्रायपॉड, लेन्स, लाईट, बॅग, माईक, अल्बम आणि बऱ्याच नवनवीन वस्तू येथे फोटोग्राफर बांधवांसाठी कमी दरामध्ये विक्री साठी ठेवण्यात आल्या होत्या.
या कार्यक्रमाला दौंडचे आमदार ॲड. राहुल कुल, पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, वेलजी शहा, अभय काप्रे, अप्पासाहेब पवार, विकास शेलार, विकास खळदकर, नितिन दोरगे, नंदकुमार जाधव, राज सातव, मल्लिकार्जुन हिरेमट, फैयाज शेख, दिपक काळभोर, महेश दाभोळे, संजय ओसवाल, राणी जमखंडीकर, विकास कोकाटे आदी मान्यवरांनी हजेरी लावली.
फोटोग्राफर असोसिएशनचे संस्थापक राजेश पाटील, वैभव म्हेत्रै, अध्यक्ष सचिन गायकवाड, उपाध्यक्ष योगेश लांडगे, सह-उपाध्यक्ष नंदकुमार पाडुळे, सचिव कैलास पंडित, खजिनदार पोपट खळदकर, सह-खजिनदार दिलीप मोरे, कार्याध्यक्ष अतुल जाधव पदाधिकारी व संचालक तसेच सर्व ६०० पेक्षा जास्त सभासद सहभागी झाले होते.