वडिलांच्या पुण्यस्मरणाचा खर्च टाळून गरजू विद्यार्थ्यांना मदत

राहू, दौंड : दौंड तालुक्यातील राहू येथील स्वर्गीय दामू (आण्णा) भिकू काळे यांच्या द्वितीय पुण्यस्मरणार्थ दिनांक १५ ऑगस्ट २०२५ रोजी कैलास विद्या मंदिर राहू येथील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक (ज्या विद्यार्थ्यांना आई किंवा वडील नाही) अशा २० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले. वडिलांच्या पुण्यस्मरणाच्या खर्चाला फाटा देत गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य दिल्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता.

आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो. या उद्देशाने काळे परिवारांनी घेतलेला उपक्रम हा खूपच स्तुत्य होता. समाजातील वास्तव गरज पाहून दानशूरांनी गरजूना मदत करावी असे आवाहन यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शिवाजी सोनवणे यांनी केले. तर विधायक उपक्रमांमुळे माझ्या वडिलांच्या स्मृती कायम जागृत राहतील. भविष्यातही स्मृतिदिनानिमित्त सामाजिक, विधायक उपक्रमांवर आमचा भर राहणार आहे. असे संतोष काळे, उपशिक्षिका सीमा काळे यांनी यावेळी सांगितले.

याप्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बंडू नवले, किसन शिंदे, माजी सरपंच दिलीप देशमुख, गणेश शिंदे, सचिव परशुराम शिंदे, कैलास शिक्षण मंडळाचे संचालक चिमाजी कुल, अरुण नवले, बापु निंबाळकर, भारतीय सैनिक महेश आदक, जांभूळ उत्पादक शेतकरी दिनेश भुजबळ, सखाराम शिंदे, मुख्याध्यापक प्रकाश जगदाळे, उपमुख्याध्यापक शांताराम टिळेकर, पर्यवेक्षक रामदास शिंदे, शिवदास शिंदे, गिरीश भोसले , सुरेश सोनवणे, फौजदार संतोष कदम, टिळेकर गुरुजी, अजय जाधव, यशवंत शिंदे, संदीप चव्हाण यांच्यासह पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल टेंगले यांनी केले तर आभार बन्शीलाल शिंदे यांनी मानले.