आंतरराष्ट्रीय :
जगाला घरातच बंदिस्त करून ठेवणाऱ्या कोरोनाने पुन्हा आपले डोके वर काढले असून आता कोरोनाच्या विषाणूने आपला नवा रुद्रावतार दाखवत स्वतःचे स्वरूप बदलले आहे. त्यामुळे युकेमध्ये या कोरोनाच्या नव्या स्वरूपाने संसर्गाचा धोका पुन्हा वाढला असून अनेक देशांनी खबरदारीचा उपाय म्हणून या देशात येणारी आणि जाणारी विमान सेवा स्थगित केली आहे.
ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा चेहरा समोर येताच युरोपियन युनियन देशांसह अनेक देश आता युकेशी होणारी हवाई वाहतूक थांबविण्याचा निर्णय घेत आहेत. तर काही देशांनी विमानसेवा स्थगितही केली आहे. युकेला जाणारी विमान सेवा स्थगित करण्याचा निर्णय जर्मनी, फ्रान्स आणि इटली, कॅनडा यांनी घेतला आहे.
भारतानेही 31 डिसेंबर पर्यंत युकेची सर्व विमान सेवा रद्द केली आहे. उद्या दि. 22 डिसेंबरपासून ही स्थगित असणार आहे. कोरोनाने व्हायरसने बदललेले रूप हे जास्त धोकादायक असून त्याचा संसर्गवाढीचा वेग खूपच जास्त आहे. कोरोनाचा बदलेला चेहरा हा हाताबाहेर जाणारा असल्याची माहीती युकेचे आरोग्य सचिव मॅट हॅन्कॉक यांनी दिली आहे.
त्यामुळे या कोरोनाच्या या नव्या अवताराची धास्ती सर्वांनीच घेतली असून या बदलत्या कोरोनाचे रुग्ण हे इटली, डेन्मार्क आणि नेदरलँड्स मध्येही आढळून आले आहेत.