दौंड : दौंड तालुक्यातील राजकीयदृष्ट्या चर्चेत असलेल्या कुसेगाव ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी डॉ.अमोल शितोळे यांची निवड करण्यात आली आहे. विद्यमान उपसरपंच किरण मनोहर गायकवाड यांनी राजीनामा दिल्याने ही जागा रिक्त झाली होती.


गुरुवार दिनांक १० जुलै रोजी कुसेगाव ग्रामपंचायत कार्यालयामध्ये उपसरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली. सरपंच वैशाली रमेश शितोळे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. सचिव म्हणून ग्रामविकास अधिकारी संतोष कांबळे हे होते. कुसेगावचे माजी उपसरपंच डॉ.अमोल गणेश शितोळे, तसेच माजी उपसरपंच विनोद माणिकराव शितोळे या दोघांचे अर्ज उवसरपंच पदाच्या निवडणुकीसाठी प्राप्त झाले होते.
अर्ज मागे घेण्याच्या वेळेत कोणीही अर्ज मागे न घेतल्याने बहुमताने हात वर करून मतदान घेण्याचा निर्णय झाला. यामध्ये डॉ.अमोल गणेश शितोळे यांना अनुक्रमे छाया शितोळे, किरण गायकवाड, दीपक रुपनवर, सुप्रिया भोसले, अनिता चव्हाण, डॉ.अमोल शितोळे अशी 6 मते मिळाली तर विनोद शितोळे यांना शर्मिला शितोळे, वैशाली शितोळे अशी 3 मते मिळाली. सर्वाधिक 6 मते मिळाल्याने डॉ. अमोल शितोळे यांना उपसरपंच म्हणून घोषित करण्यात आले.
या वेळी उद्योजक मोहन शितोळे, संजय गायकवाड, महेश रुपनवर, शुभम शितोळे, विशाल शितोळे, दत्ता शितोळे, नितीन शितोळे, विनोद शितोळे, किरण शितोळे, सोमनाथ शितोळे, मनोज शितोळे यादी उपस्थित होते. ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांनी दाखवलेल्या विश्वासाला कधीही तडा न देता गावच्या विकासासाठी सदैव प्रयत्न करणार असल्याचे नवनिर्वाचित उपसरपंच डॉ.अमोल गणेश शितोळे यांनी सांगितले.







