वाखारी (दौंड) : दौंड तालुक्यातील वाखारी येथे असलेल्या श्री धनाजी शेळके फार्मसी महाविद्यालयात प्रथम वर्ष बी. फार्मसी तसेच थेट द्वितीय वर्ष बी. फार्मसी प्रवेश प्रक्रिया 2025–26 साठी कागदपत्रे पडताळणी केंद्र / सुविधा केंद्र सुरू करण्यात आले आहे.
या सुविधा केंद्रामार्फत विद्यार्थ्यांचे मोफत ऑनलाइन फॉर्म भरणे आणि कागदपत्रांची पडताळणी करण्यात येणार आहे. त्यामुळे परिसरातील विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेसाठी मोठी मदत होणार असल्याची माहिती संस्थेच्या सचिव राधिका शेळके यांनी दिली आहे.
या बाबत अधिक माहिती देताना सुविधा केंद्राचे प्रमुख विकास गडधे म्हणाले, विद्यार्थ्यांची कोणत्याही अडचणीशिवाय प्रवेश प्रक्रिया पूर्ण व्हावी यासाठी आमच्या महाविद्यालयात मोफत फॉर्म भरणे आणि कागदपत्र पडताळणीची सुविधा पुरवण्यात येत आहे. रविवार सुद्धा हे केंद्र विद्यार्थ्यांसाठी खुले राहणार आहे.
जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्राचार्य डॉ.संतोष वाघमारे यांच्याकडून करण्यात आले आहे.