दौंड : सहकारनामा
बोरीपार्धी (ता.दौंड) गावचे जेष्ठ मार्गदर्शक तथा दौंड तालुक्याचे पहिले व सलग 11 वर्षे उपसभापती पद भूषविलेले लक्ष्मणराव (आबा ) बाबुराव सोडनवर यांचे अल्पशा आजाराने दुःखद असे निधन झाले.
दिवंगत आमदार सुभाषअण्णा कुल आणि विद्यमान आमदार राहुल कुल यांचे आबा हे निकटवर्तीय होते. आबांचे चिरंजीव जयदीप सोडनवर हे बोरीपार्धी ग्रामपंचायतीचे सरपंच राहिले असून आणि त्यांच्या सूनबाई या विद्यमान सरपंच होत्या. स्पष्टवक्ते आणि दिलदार व्यक्तिमत्व म्हणून आबांची ख्याती होती.
आबांच्या अचानक जाण्याने बोरीपार्धी गावावर शोककळा पसरली आहे.
आबांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हिच ‛सहकारनामा’ परिवाराच्या वतीने आबांना भावपुर्ण श्रद्धांजली!