Political – राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष ‛या’ कारणासाठी पदावरून ‛बडतर्फ,’ बडतर्फीचा निर्णय माझ्यासाठी अन्यायकारक : उपाध्यक्ष



दौंड : सहकारनामा

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे दौंड तालुका उपाध्यक्ष रामदास दोरगे यांना तालुका युवक उपाध्यक्ष पदावरून बडतर्फ करण्यात आल्याचे पत्र तालुका अध्यक्ष विकास खळदकर यांनी दिले आहे. याबाबतची माहिती खुद्द रामदास दोरगे यांनी दिली आहे.

रामदास दोरगे यांनी भांडगाव ग्रामपंचायतीला  उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांनी आपला उमेदवारी अर्ज माघारी न घेता निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्यांनी पक्षविरोधी कारवाई केल्याचा आणि पक्षादेश झुगारल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

याबाबत रामदास दोरगे यांनी माहिती देताना आपण तालुकाध्यक्ष पक्ष श्रेष्ठींना आपणास पॅनेलमध्ये घेण्याची विनंती केली होती आणि मी कोणत्याही वार्डमधून उभे राहण्यास तयार असल्याचे सांगितले होते. मात्र यावेळी मला पक्षाच्या अध्यक्षांनी आमचा गावात संबंध नसतो, आम्ही गावच्या विषयात कुणालाच फोन करणार नाही आणि लक्ष घालणार नाही असे सांगितले होते. 

त्यामुळे मी आपला उमेदवारी अर्ज माघारी न घेता तसाच ठेवल्यामुळे माझ्यावर जी त्वरित बडतर्फीची कारवाई करण्यात आली ती मात्र वरील विधानाशी मेळ खात नाही, आणि तो अन्यायकारक असून  ग्रामपंचायत निवडणूक हि माझ्या एकट्यामुळे लागली नसून इतरही चार लोकांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी न घेता तसेच ठेवले आहेत.

त्यामुळे आपल्यावर ठेवण्यात आलेला ठपका हा अन्यायकारक असून जर इतर लोकांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले असते तर मी एकापायावर आपला उमेदवारी अर्ज मागे घेऊन निवडणूक बिनविरोध करण्यास तयार होतो असे सांगितले.