Innovative Konkan : उपमुख्यमंत्री अजितदादांचा ‛कोकणासाठी’ नवा प्लॅन, लवकरच होणार घोषणा!



मुंबई : सहकारनामा

राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये काही ना वैशिष्ट्ये दडलेली आहेत. आणि हि वैशिष्ट्ये शोधून त्याचा फायदा तेथील नागरिकांना आणि जिल्ह्याला कसा होईल याबाबत राज्यसरकार सध्या प्रयत्नशील आहे.

अश्याच एका प्रोजेक्ट बाबत आज मुंबईतील राज्य सह्याद्री अतिथीगृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये एक विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती.

हि बैठक राज्याचा महत्वाचा भाग असणाऱ्या कोकणबाबत घेण्यात आली असून कोकणात नैसर्गिक साधनसंपत्तीबरोबर ‘इनोव्हेटीव्ह’ संशोधनासाठी अनुकूल वातावरण व क्षमता असल्याने रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे ३ जिल्हे ‘इंटरनॅशनल ग्रीनफिल्ड इनोव्हेटिव्ह रिजन’ म्हणून विकसित करण्यासंदर्भात त्यावर मोठी सकारात्मक चर्चा झाली.

राज्य सरकार कोकणचा ‘इंटरनॅशनल ग्रीनफिल्ड  इनोव्हेटिव्ह रिजन’ विकास करण्यासाठी सकारात्मक आहे. मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे यांच्यासमोर सादरीकरणानंतर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल अशी माहिती यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

पुढे याबाबत अधिक माहिती देताना पर्यावरणाचा ऱ्हास न करता कोकणचा विकास या माध्यमातून हा प्रकल्प साधला जाणार आहे. हा प्रकल्प राज्यासाठी भविष्यातील मोठी गुंतवणूक ठरेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.