सुपे येथे कव्वालीचा कार्यक्रम संपल्यानंतर  दोघांना टोळक्याकडून बेदम मारहाण

अब्बास शेख

पुणे : बारामती तालुक्याच्या सुपे येथील उरुसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कव्वालीच्या कार्यक्रमानंतर घरी जात असणाऱ्या एका युवकाला चौघांच्या टोळक्याने बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. याबाबत सुपे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक १८ मे रोजी रात्री १२:३० वाजण्याच्या सुमारास  यातील फिर्यादी अविनाश शाहू आवळे व त्यांचा मेहुणा अक्षय तानाजी देवकुळे (रा. सुपा ता. बारामती जि.पुणे) हे असे सुपा गावातील कव्वालीचा कार्यक्रम संपल्यानंतर सुपा बाजार पेठेतुन घरी जात असताना आरोपी प्रतिक जगताप, आदित्य जगताप, सम्यक धेंडे आणि त्यांचा एक अनोळखी मित्र यांनी स्कुटी मोटार सायकलला साईड न दिल्याच्या कारणावरून अविनाश शाहू यांना प्रतिक जगताप याने हाताने, लाथाबुक्याने मारहाण केली.

तसेच यावेळी फिर्यादीचा मेव्हणा अक्षय तानाजी देवकुळे यास प्रतिक जगताप, आदित्य जगताप, सम्यक धंडे व त्यांचा एक अनोळखी मित्र यांनी फरशी आणि विटांनी डोक्यात, खांद्यावर, पाठीमध्ये मारहाण करून शिवीगाळ, दमदाटी करत जिवे मारण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे वरील आरोपिंवर सुपे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.