झहीर खान यांची महाराष्ट्र क्रिकेट संघामध्ये निवड

दौंड : दौंड भूषण म्हणून सन्मान मिळालेल्या शफी खान सर यांचे सुपत्र पुणे पोलिस येथे कार्यरत असणारे झहीर खान यांची महाराष्ट्र क्रिकेट टीम मध्ये निवड करण्यात आली आहे.  महाराष्ट्र प्रौढ क्रिकेट असोसिएशन (Maharashtra veteran cricket association) कडून ही निवड करण्यात आली आहे.

दोन दिवसीय होत असलेल्या या स्पर्धेमध्ये  महाराष्ट्रासह मुंबई, बडोदा आणि गुजरात हे संघ भाग घेत असल्याची माहिती महाराष्ट्र प्रौढ क्रिकेट संघटनेचे सहसचिव हेमंत किणीकर यांनी दिली आहे. खालील प्रमाणे संघ जाहीर करण्यात आला आहे.

या स्पर्धेसाठी खालील खेळाडूंची निवड करण्यात आली आहे :  रणजित खिरीड (कर्णधार), श्रीपाद भागवत, हृषीकेश मत्से, पंकज वाघचौरे, विवेक देशमुख, आतिश पडवळ, पराग चितळे, झहीर खान, देवेन मेंढी, सचिन कापडे, प्रवीण कांबळे, मनोहर पाटील दर्शन कावर, वीरेंद्र आरेकर, मनोज पवळे