Breaking… दौंडमध्ये पोलिसांना मारहाण

दौंड : दौंड शहराजवळ असणाऱ्या आलेगाव, धुमाळ वस्ती येथे पोलिसांना मारहाण करण्यात आल्याची गंभीर घटना घडली आहे. या प्रकरणी दोन जणांवर  दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून नजीर गफुरभाई तांबोळी (वय- 44, व्यवसाय- नोकरी नेमणुक दौंड पोलीस स्टेशन) यांनी फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार दि.12 मार्च रोजी रात्री 09:30 वाजता फिर्यादी पोलीस नजीर तांबोळी यांना आलेगाव धुमाळ वस्ती येथून डायल 112 नंबरवर कॉल आला. सदर कॉल ची पूर्तता करण्यासाठी फिर्यादी व सोबत पोलीस कॉन्स्टेबल येणारे असे सरकारी वाहनाने गेले होते. तेथे आरोपी कांतीलाल रघुनाथ भोकारे 2) अशोक रघुनाथ भोकारे (दोघे रा.आलेगाव, धुमाळवस्ती ता.दौंड जि.पुणे) यांनी पोलिसांना उद्देशून, तुम्ही पोलीस आमच्या घरगुती भांडणात का पडता असे म्हणून त्यांना अश्लील शिवीगाळ करत तुमची नोकरीच घालून टाकतो, आम्ही कोण आहे ते तुम्हाला दाखवतोच अशी शिवीगाळ करून धमकी देऊन त्यांच्या अंगावर धावून आले.

त्यावेळी आरोपी नामे अशोक रघुनाथ भोकरे याने फिर्यादी यांच्या अंगावरील युनिफॉर्म शर्ट धरून फिर्यादी यांना खाली पाडून लाथा बुक्क्यांनी पाठीत पोटात मारहाण केली तसेच आरोपी कांतीलाल रघुनाथ भोकरे याने त्याच्या हातात लोखंडी कोयता घेऊन पोलीस कॉन्स्टेबल येणारे यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला असे फिर्यादित नमूद करण्यात आले असून वरील मजकुराच्या फिर्यादीवरून दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार लोहर करीत आहेत.