इन्स्पायर्ड विंग एज्युकेशनल फौंडेशनच्या वतीने इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये योग प्रशिक्षणाचे धडे

दौंड : इन्स्पायर्ड विंग एज्युकेशनल फौंडेशन तर्फे आज काळेवाडी येथील कटारिया इंग्लिश मिडीयम शाळेमध्ये योग प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी सर्व विद्यार्थ्यांना इन्स्पायर्ड विंग एज्युकेशनल फौंडेशन च्या वतीने विजय जगदाळे यांनी योगाचे प्रशिक्षण दिले.

यावेळी इन्स्पायर्ड विंग एज्युकेशनल फौंडेशन चे सचिव ॲड. प्रशांत गिरमकर, प्राचार्या पूजा मॅडम, खेडकर सर व इतर शिक्षक व मोठया प्रमाणावर विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी जगदाळे यांनी दिलेल्या योगा प्रशिक्षणामुळे विध्यार्थ्यांमध्ये स्फूर्ती आणि आनंद जाणवत होता.

इन्स्पायर्ड विंग एज्युकेशनल फौंडेशन तर्फे शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी नेहमीच असे आरोग्याच्या निगडित उपयुक्त कार्यक्रम घेतले जातात असे फाउंडेशन चे सचिव प्रशांत गिरमकर यांनी सांगितले.